जिल्हा

नगरसेवक रमेश म्हात्रेंसह आरोपींचा जामीन रद्द

नगरसेवक रमेश म्हात्रेंसह आरोपींचा जामीन रद्द
नगरसेवक रमेश म्हात्रेंसह आरोपींचा जामीन रद्द फोटो: ठाणे वैभव

तीन दिवसांत पोलिसांसमोर शरण येण्याचे निर्देश

कल्याण : शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह प्रकरणातील आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने दाखल केलेल्या जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट क्रमांक २मध्ये सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आरोपींचा जामीन रद्द करून त्यांना शरण येण्याचे निर्देश दिल्याची माहिती डॉक्टर वैभव यांचे वकील अभिनय अडसूळ यांनी दिली.

सुनावणीदरम्यान रमेश म्हात्रे यांच्याविरोधातील यापूर्वीच्या १८ गुन्ह्यांमधील जामिनाचा मुद्दा तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणाशी संबंधित बाबींवर युक्तिवाद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रमेश म्हात्रे यांच्यासह संबंधित आरोपींना पुन्हा पोलिसांसमोर शरण जावे लागणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे महिला डॉक्टरांच्या वडिलांनी स्वागत केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. बाविस्कर यांनी न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे डॉक्टरांना न्याय मिळेल आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या प्रकरणाची सुनावणी कल्याण न्यायालयात जलदगतीने सुरू असून, महिला डॉक्टरांची साक्ष ६ ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बाविस्कर यांनी दिली. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्याची नियमित सुनावणी सुरू आहे. दरम्यान, प्रकरणातील अन्य आरोपी साधना कारंडे यांचा जामीन अर्ज यापूर्वी कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे आता लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475